नजरेचा वार कसा..आरपार होता..
हृदयावर माझ्या..तो पहिलाच घाव होता..
कटाक्षांनी तुझ्या..काळीज चिरले..
इशाराच तो..देखणा गुन्हेगार होता...
टाळूनी नजर..पुन्हा फिरूनी पाहणे..
योगायोग हा तसा..वारंवार होता...
अनोळखी नजरेने..केले बरेच वादे...
नजर चोरणे..फक्त सोपस्कार होता..
-- अंतरा..
( कश्ती सलिम शेख.)
Sunday, 29 April 2018
सोपस्कार..
Thursday, 26 April 2018
आधे अधुरे...
तूच खेळ मांडलास..जो तुला खेळायचाच नव्हता..
सारिपाट पुराव्यांचा..मी अजूनही जपतेय बघ...
तुझं माझं प्रेम पाहून..लाटा ही उसळायच्या...
त्या किनाऱ्यावर आपल्या..पाऊलखुणा सांडल्यात बघ..
कित्येक सांजवेळा.. तुझ्या मिठीत विरल्या..
कुशीत माझ्या अजून..तुझा श्वास दरवळतोय बघ..
कैकदा विरघळले..श्वास तुझ्या श्वासांत..
रंग ओठांचे माझ्या..तुझ्या ओठांवर उरलेत बघ...
लेखणीस सुद्धा माझ्या..तुझाच साज होता..
गाळलेली पानं माझी..एकदा वाचून बघ...
परी शब्दांचे आता..तुजसाठी जुळणे नाही....
क्षण बोचतायत सारे..माझी गझल खुंटली बघ...
--अंतरा...
( कश्ती सलिम शेख. )
Friday, 30 March 2018
अबोल भावना..
हे शब्दांचे खुंटणे..सारया मुक्याच भावना..
मुके प्रेम माझे..आज लेखणी अबोल आहे..
साधा श्वास घ्यावा.. तरी तुला साद जाइ..
नादात स्पदनांच्या..आज तुझे गीत आहे..
अलवार तुझी ओढ..दिस सरतच नाही..
वेडेखुळे तुझे स्वप्न..आज धुंद रात आहे..
तुझ्या गोड गोड बाता..जशी साखरपेरणी..
एकांती आठवांची..आज रिमझिम आहे..
तुझे हळूवार भास..मन भरतच नाही..
गालावरी आसवांची..आज बरसात आहे..
आज हासता हासता..श्वासात कैफ आला..
आज उगा विखुरले..साक्षी चांदरात आहे..
मुक्या भावनांची झाली परि..लेखणीशी भेट..
आज गझलीस सुद्धा..सख्या तुझाच साज आहे..
- - अंतरा ..
( कश्ती सलिम शेख .)