Sunday, 30 July 2017

भेट...

भेट...

तुझ्या भेटीसाठी..मन पाखरु हाेऊन उडतं...
तुझ्या प्रेमाच्या हिंदोळ्यावर..मनमुराद झुलतं...

तुझ्या येण्याची खबर मला..तुझ्या येण्याआधीच कळते...
मंद वारया ची झुळूक मला..तुझ्या सुगंधाने छळते..

तुझ्या चाहुलीने मी..अलगद बट सावरते...
नेमकी त्याच वेळी..तुझी हाक कानी येते...

द्वाड वारा..पायाखालची वाळू हळूच पळवतो...
आपले हात हातात पाहून..सागरही खवळतो..

अशी भेट व्हावी..एका भेटीत आयुष्य सरावं..
नेमकं त्याच वेळी..सूर्यालाही माझ्या मनातलं कळावं..

तुझ्या माझ्या प्रेमावर..हा सूर्य उगाच जळतो...
आपली ' भेट ' पूर्ण होण्याआधीच..मुद्दाम मावळतो...

                                                -- अंतरा...
                                         (कश्ती सलिम शेख. )